Home Uncategorized Kalyan News : तुम हमसे फिर से छुप रहे हो,और.. फुकट्या प्रवाशांकडून...

Kalyan News : तुम हमसे फिर से छुप रहे हो,और.. फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात 16 लाखांचा दंड वसूल, 167 टीसींची कारवाई

266
0

कल्याण रेल्वे स्टेशनवर टीसींनी विशेष तपासणी मोहीम राबवली. 167 टीसींनी स्टेशनवर साखळी तयार करत फुकट्या प्रवाशांची नाकाबंदी केली. हजारो फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

17 ऑक्टोबर 2023 : रेल्वेतून प्रवास करताना अनेक जण तिकीट न काढताच, फुकट (without ticket) प्रवास करत असतात. बरेच वेळा टीसींकडून पकडले गेले तरी, दंड भरावा लागला तरीही ते धडा शिकत नाहीत आणि फुकट प्रवास सुरूच ठेवतात. नागरिकांची लाईफलाइन असलेल्या मुंबई रेल्वेतूनही (सहवोग तदमोत)  अनेक जण फुकट प्रवास करतात. सध्या फुकट्या प्रवाशांची संख्याही खूप वाढली आहे. हेच लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

कल्याण स्टेशनवर दीडशेहून अधिक टीसींनी ( तिकीट तपासनीस)  (TC) फुकट्या प्रवाशांची नाकाबंदी केली. दिवसभरात ४ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांना रोखून त्यांच्यावर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. त्या दंडाची एकूण रक्कम सुमारे 16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तुम हमसे फिर से छुप रहे हो… और हम तुम्हारा स्टेशन पे फिर से इंतजार कर रहे हैं!”

मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची, तिकीट न काढताच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे रेल्वे विभागाची डोकेदुखी वाढली आहे. लोकलमधील फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याचा फायदा घेत अनेक जण विना तिकीट प्रवास करण्यात यशस्वी होत असल्याने त्यांची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वेने ही मोहीम उघडली होती.सोमवार सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत तब्बल 167 टीसींनी साखळी करत कल्याण स्टेशनवर तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत टीसींनी फुकट्या प्रवाशांची नाकेबंदी केली. दिनसभरात टीसींनी तब्बल 4438 अशा प्रवाशांना रोखले, ज्यांनी तिकीट काढलं नव्हतं म्हणजेच ते फुकट प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांकडून जो दंड वसून करण्यात आला तो होता तब्बल 16.85 लाख रुपये. कल्याण स्टेशनवर झालेल्या मोहिमेच्या धर्तीवर आता रेल्वेच्या इतर स्टेशनवरही अचानकपणे मोठ्या संख्येने टीसी तैनात करून तिकीट तपास मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली

Previous articleवेळापत्रक फेटाळलं, शेलक्या शब्दात सुनावलं, राहुल नार्वेकरांबाबत कोर्ट काय काय म्हणालं?
Next articleअजितदादांवरील आरोपामागे भाजपचा हात, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here