Home News Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा दहावा दिवस, संघर्ष सुरुच

Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा दहावा दिवस, संघर्ष सुरुच

714
0

Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Hamas Guerrilla War Tactics : हमासनं युद्धाची कार्यशैली बदलली?

आधुनिक शस्त्रास्त्रांची सुसज्ज असे इस्त्रायल सैन्य, टेहाळणीसाठी असलेली अत्याधुनिक यंत्रणा, आयरन डोम सिस्टिम आणि त्याच्या जोडीला असलेली इस्त्रायलची मोसाद ही गुप्तचर यंत्रणा. मात्र, 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्रायलवर हजारो रॉकेट डागले आणि या हल्ल्यात शेकडो लोकं मारली गेली. हमासने 7 ऑक्टोबर रोजी सकाळी केलेल्या हल्ल्याने संपूर्ण जगात खळबळ माजली. हमासकडून 40 हजार अतिरेकी या हल्ल्यात सहभागी झाले. हमास या संघटनेनं आपल्या युद्धाची कार्यशैली बदलली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

16/10/2023 12:29:12

Israel-Hamas War : हमासकडून गनिमी काव्याचा वापर?

Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel-Hamas War) यांच्यात युद्ध सुरुच आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहे. या युद्धातील मृतांचा आकडा वाढतानाच दिसत आहे. हमासने इस्त्रायलवर हल्ला केला आणि चर्चा सुरु झाली ती त्यांच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची… मोसादसारख्या जगातील सर्वाच अत्याधुनिक गुप्तचर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. मात्र, यातूनच प्रश्न असा उपस्थित राहतो की ‘हमास’ने युद्धासाठी गनिमी कावा वापरायला सुरुवात केली आहे का हा प्रश्न निर्माण होतो.

16/10/2023 12:10:45

Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा आज दहावा दिवस

इस्रायल-हमास युद्धाचा आज दहावा दिवस आहे. हल्ल्यानंतर इस्रायलने हमासला नेस्तनाबूत करण्याची शपथ घेतली आहे. इस्रायली सैन्याने गाझाला वेढा घातला आहे.

16/10/2023 10:12:52

Biden to Iran on Israel Hamas War : जो बायडन यांचा इराणलाही इशारा

US President Joe Biden on Israel Hamas War : जो बायडन यांनी इस्त्रालय हमास वादात ढवळाढवळ करणाऱ्या इराणलाही इशारा दिला. ते म्हणाले की, इराणनं हे युद्ध वाढवण्याचं काम करू नये. यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन यांनी आपला देश कारवाई करू शकतो, असा इशारा दिला होता. इराण केवळ निरीक्षक राहू शकत नाही, असं ते म्हणाले होते. युद्धाची व्याप्ती वाढल्यास अमेरिकेलाही मोठा फटका बसेल, असा इशाराही इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला होता.

16/10/2023 09:49:50

Biden on Israel Hamas War : हमासला संपवून टाकू – जो बायडन

Biden on Israel Hamas War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी हमासला (Hamas) इशारा दिला आहे. हमासला संपवून टाकू, असं म्हणत राष्ट्राध्यक्ष बायडन कडाडले आहेत. तर गाझावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न इस्रायलनं अजिबात करु नये, असा सल्लाही अमिरेकेनं इस्रायलला दिला आहे. एवढंच नाहीतर इस्त्रालय हमास वादात ढवळाढवळ करणाऱ्या इराणलाही अमेरिकेनं स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. 

16/10/2023 09:40:33

Israel-Hamas Conflict Updates : इस्रायल-पॅलेस्टिनी युद्ध सुरुच

गाझा येथे इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आतापर्यंत 2215 पॅलेस्टिनींना आपला जीव गमावला आहे, जखमींची संख्या 8,714 आहे. मृतांमध्ये 700 मुलांचाही समावेश आहे. वेस्ट बँकमध्ये आतापर्यंत 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मृतांची संख्या 1300 वर पोहोचली आहे, तर 3400 लोक जखमी आहेत. 14 ऑक्टोबरपर्यंत इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहेत.

16/10/2023 09:19:25

Operation Ajay : भारतीयांनी सुखरुप आणण्यासाठी भारताचं ऑपरेशन अजय

इस्रायलच्या आणि हमासच्या युद्धामध्ये अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. तर अनेक जण पोरके होत आहेत. या युद्धाची विद्रोहकता इतकी तीव्र होत चालली आहे, की यामध्ये अनेकांनी प्राण गमावले तर घर, कुटुंबही गमावलं आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मयादेशी परत आणण्यासाठी भारताकडून ऑपरेशन अजय देखील सुरु करण्यात आले आहे. 

16/10/2023 09:19:02

Operation Ajay : भारतीयांनी सुखरुप आणण्यासाठी भारताचं

इस्रायलच्या आणि हमासच्या युद्धामध्ये अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. तर अनेक जण पोरके होत आहेत. या युद्धाची विद्रोहकता इतकी तीव्र होत चालली आहे, की यामध्ये अनेकांनी प्राण गमावले तर घर, कुटुंबही गमावलं आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मयादेशी परत आणण्यासाठी भारताकडून ऑपरेशन अजय देखील सुरु करण्यात आले आहे. 

16/10/2023 09:18:29

Israel Hamas War : इस्त्रायल-हमासच्या युद्धात भारतीय वंशाच्या तीन महिला मृत्यूमुखी

इस्रायल (Israel) आणि हमासचे (Hamas) युद्ध (War) मध्ये भारतीय वंशाच्या (Indian) तीन महिलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील एक महिला ही मूळची महाराष्ट्राची (Maharashtra) असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या किम डोकरकर या महिलेचा या युद्धादरम्यान मृत्यू झाला. किम डोकरकर या इस्रायली सैन्यात त्यांचं कर्तव्य बजावत होत्या. त्याच दरम्यान त्यांना वीरमरण आलं. तर यातील दुसरी महिला ही इस्रायलच्या पोलीस दलात कार्यरत होती. यामधील एका महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही.

पार्श्वभूमी

PlayUnmute

Loaded: 15.47%

Remaining Time -9:46Close Player

Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.

Previous articleमोहटा देवीकडं दुष्काळ दूर करण्याचं साकडं, निलेश लंकेंवर स्तुतीसुमनं; पारनेरमध्ये दणक्यात एन्ट्री करत अजित दादांचं धडाकेबाज भाषण
Next articleMgnrega : दिलासादायक! मनरेगाच्या निधीत सरकार करणार एवढ्या कोटींची वाढ, बजेटमधील 95 टक्के निधी खर्च

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here