Home Uncategorized Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार?

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार?

384
0

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्रीपदासाठी सत्ताधारी तीन पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं बघायला मिळत आहे. या दरम्यान फडणवीस यांच्याबद्दल मोठा दावा करण्यात आलाय.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती आखली जात आहे. भाजपला आगामी लोकसभा निवडणूक काहीही करुन जिंकायचीच आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 45 जागांवर भाजपला विजय मिळवायचा आहे. या निवडणुकीसाठी भाजप पक्षातील राज्यातील मोठ्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले नेते लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार बघायला मिळण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भाजपच्या या रणनीतीबाबत चर्चा सुरु असतानाच संजय शिरसाट यांचं वक्तव्य समोर आलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता लोकसभेची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत मोठा दावा केलाय.

फडणवीसांचा इथला दाणापाणी उठलाय, आता केंद्रामध्ये गच्छंती’

“देवेंद्र फडणवीस यांनी छान प्रकारे सांगितलं आहे की, येत्या काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील. मुळात फडणवीस करतात तसं वागत नाहीत. याचा एक अर्थ फडवीसांचा इथला दाणापाणी उठलेला आहे. आता त्यांची गच्छंती केंद्रामध्ये होत आहे”, असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला. “दुसरा अर्थ फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची फार मोठी फसवणूक केली आहे”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केला.“अजित दादांनी साधनं कायं वापरली, यापेक्षा ते साध्य कायं करत आहेत हे पहिलं पाहिजे. अजित पवार शिंदे आणि शिंदेंच्या गटाला जाणीव करून देत आहेत की, भाजपची नीती युज अँड थ्रो आहे. वापर झाला की भाजप त्याला फेकून देते. याचंप्रमाणे भाजप महादेव जानकर, राजू शेट्टींच्या सोबत वागले. सदाभाऊ खोत यांच्या सोबतही तसेच वागले. आता शिंदेंचा वापर संपलेला आहे, आता त्यांना फेकून देऊन ते अजित पवारांना हाताशी धरत आहेत”, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

Previous articleHealth star ratings Kellogg reveals the cereal
Next articleमोहटा देवीकडं दुष्काळ दूर करण्याचं साकडं, निलेश लंकेंवर स्तुतीसुमनं; पारनेरमध्ये दणक्यात एन्ट्री करत अजित दादांचं धडाकेबाज भाषण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here