मराठ्याच्या आत्महत्यांना सरकार जबाबादार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या, असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजातील एका बांधवाने काल आत्महत्या केली. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला. मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही, असा हुंकार मराठा आंदोलक मनोज जरांगेनी दिला आहे. तसेच मनोज जरांगेसह आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगेनी केला आहे. राजगुरूनगरमधील सभेत मनोज जरांगे बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, मला मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाही. मी हार, तुरे स्विकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गावागावात फिरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आत्महत्यांना सरकार जबाबादार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या,