Home Uncategorized Baramati Crime News | १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येने हादरली बारामती: छेडछाड, धमक्या...

Baramati Crime News | १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येने हादरली बारामती: छेडछाड, धमक्या आणि मानसिक त्रासामुळे घेतलं टोकाचं पाऊल

104
0

बारामती – बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे घडलेली एक दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ८ एप्रिल २०२५ रोजी घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे मित्र प्रविण गावडे, शुभम गावडे आणि सुनील खोमणे हे चार जण तिला सतत त्रास देत होते. विशाल गावडे हा मुलीचा पाठलाग करीत होता, तिला लग्नासाठी दबाव टाकत होता आणि विरोध केल्यास तिच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेने बारामतीसह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, अल्पवयीन मुलींविरोधातील अत्याचार आणि मानसिक छळाच्या वाढत्या घटनांबाबत जनतेमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “मी या प्रकरणाची माहिती घेत आहे आणि वस्तुस्थिती समजून घेईन. मुलांनी अशा गोष्टी मनाला लावून न घेता योग्य मार्गाने तक्रार करावी. सरकारने यासाठी मदत आणि तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाइन सुरू केल्या आहेत, कारण कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.”

Star Apex News Portal या हृदयद्रावक घटनेत मृत पावलेल्या विद्यार्थिनीबद्दल शोक व्यक्त करतो आणि संबंधित यंत्रणांनी यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा व्यक्त करतो.

Previous articleविराट कोहलीचं मोठं पाऊल! आयपीएल 2025 दरम्यान इंस्टाग्रामवरून सर्व जाहिरातींच्या पोस्ट हटवल्या, सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Next articleसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात : झोपेच्या डुलकीने चालकाचा ताबा सुटला, ट्रकला धडकून २ ठार, ३ गंभीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here