Entertainment

हो, मी आलिया भटला डेट करतोय : रणबीर कपूर

रणबीरने आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलणं कायमच टाळलं, मात्र अभिनेत्री आलिया भटसोबतच्या नात्याची कबुली त्याने दिली आहे.

56Views

मुंबई :- बॉलिवूडचा आगामी सुपरस्टार रणबीर कपूरचं नाव कधी कतरिना कैफसोबत जोडलं गेलं, तर कधी दीपिका पदुकोणसोबत… अवंतिका मलिक, सोनम कपूर, नर्गिस फाक्री, माहिरा खान अशी अनेक नावं यामध्ये रणबीरच्या ‘अफेअर्स लिस्ट’मध्ये होती. रणबीरने आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलणं कायमच टाळलं, मात्र अभिनेत्री आलिया भटसोबतच्या नात्याची कबुली त्याने दिली आहे.

‘जीक्यू’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने आलियाला डेट करत असल्याचं मान्य केलं. ‘हे खरंच नवीन आहे सध्या. त्यामुळे मला इतक्यात फार काही बोलायचं नाहीये. आमच्या नात्याला वेळ आणि स्पेस देण्याची गरज आहे. एक अभिनेत्री म्हणून, एक माणूस म्हणून आलिया… काय बरं शब्द वापरावा? सळसळती आहे. जेव्हा मी तिला अभिनय करताना पाहतो, किंवा ऑफ स्क्रीनही मी तिला पाहतो.. ती मला प्रोत्साहित करते. आमच्यासाठी हे नवीन आहे.. हे नातं थोडं बहरु द्या’ असं रणबीर उत्साहाने म्हणतो

‘मला आयुष्यातला हा टप्पा खूप आवडतोय.. प्रेमात नव्याने असताना नेहमीच एक्साईटमेंट असते. नवीन माणूस.. जुन्या गोष्टी पुन्हा नव्या होतात.. चार्मिंग-रोमँटिक असणं.. मला वाटतं मी सध्या खूप संतुलित आहे. रिलेशनशीप माझ्यासाठी खूप मौल्यवान असतात. दुखावलं जाणं काय असतं, याची मला कल्पना आहे. दोन वर्षांपूर्वी मी जसा होतो, त्यापेक्षा आता वेगळा आहे’ असं रणबीरला वाटतं.

आलिया आणि रणबीर आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.

आलियाच्या ‘राझी’ चित्रपटातील भूमिकेचं कौतुक रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत केलं होतं. रणबीर आणि आलिया यांनी यापूर्वीही एकमेकांवर क्रश असल्याचं कबूल केलं होतं, मात्र पहिल्यांदाच रिलेशनशीपमध्ये असल्याचं जाहीर सांगितलं.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply