nagpurruralNews

स्व अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्तिकलश दर्शनासाठी जनसागर उसळला

39Views

खापरखेडा :- दिलीप गजभिये (  रिपोर्टर )

भारतरत्न व माजी पंतप्रधान स्व अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्तिकलश गुरुवारला पोहचल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात अस्तिकलश रथयात्रा प्रारंभ झाली. गुरुवारी रात्री उशिरा खापरखेडा नगरीत अस्तिकलश रथ यात्रा पोहचली. याप्रसंगी स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्तिकलशचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला होता. यावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदर अस्तिकलश रथ यात्रेत भाजप नागपूर ग्रामिणची संपूर्ण कार्यकारणी सहभागी झाली होती. याप्रसंगी वाजपेयी अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा अटल बिहारी वाजपेयी का नाम रहेगा आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. स्व वाजपेयी यांच्या निधनाने संपुर्ण देश शोकाकुल झाला आहे. जो तो सर्व सामान्य नागरिक दुःख व्यक्त करीत आहे. खापरखेडा नगरीत अस्तिकलश दर्शन घेतल्यानंतर दोन मिनिटे मौन राहून अटलजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांच्यासह अशोक धोटे, रमेश जैन, संजय टेकाडे, प्रेम झाडे, अरविंद गजभिये, सोनबा मुसळे, राहुल तिवारी, नाना बांगळकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक झिंगरे, सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, अशोक तांदुळकर जि. प.सदस्य छाया ढोले, सुरेंद्र शेंडे, वामन कुंभारे, श्यामराव सरोदे, पंकज तांदूळकर, नितीन पुरी, किशोर खोरगडे, सुनील जालंदर, लिलाधर एकरे, किशोर बक्सरिया, रमेश लोढे, मधुकर मोटघरे, राजेश गायकवाड, सुशीला सरोदे, शोभा मोटघरे, मयूर तिरपुडे, अरविंद चिकनकर, राजू ढोके, अभय घुगल, नितीन मेश्राम, बाळू पाठराबे, भूषण मिरासे, सचिन नागरकर, अमोल कळंबे, विपीन शर्मा,योगेश जालंदर, क्रिष्णा पाल, फकिरा साहू, कुलदीप भोयर, मलवार, ईश्वर चिकनकर, प्रेमदास येनके,आरिफ सिद्दीकी, प्रवीण विवेकर, मुरली एलगु, सुरेश तांदुळकर, प्रकाश शेंडे, मोहन सतांगे, धिरज नागरकर, सागर वालके, संदेश वघारे, गौरव ठाकरे विपिन बावने, समीर शेख, शुभम पारडे, कृष्णा महोरे, रमण शाहू, राम धोपटे, महेश नगोसे, जगदीश तिवारी आदि उपस्थित होते.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply