nagpurruralNews

स्वस्त धान्य दुकानातील मालाचा काळाबाजार

गावकऱ्यांनी रेशनचा माल पकडला,तहसीलदाराने स्वस्त धान्य दुकान केले सील

63Views

कळमेश्वर :- योगेश कोरडे ( प्रतिनिधी )

दिं. 5 आगस्ट स्वस्त धान्य दुकानातील धान्य चोरीने एका शेतकऱ्यांच्या शेतात लपवून ते धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्याचा बेत ग्रामस्थांनी हाणून पाडला ही घटना कळमेश्वर तालुक्यातील भडांगी या गावात 4 आगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेदरम्यान घडली असून महसूल विभागातर्फे दुकानाला सील लावण्यात आले आहे.

धापेवाडा येथील रहिवासी लक्ष्मण दाढे यांचे भंडागी येथे स्वस्त धान्य दुकान आहे. या स्वस्त धान्य दुकानातील माल चोरीने बैलगाडीत टाकून शांताराम पासरे हे स्वतः लक्ष्मण दाडे यांच्या ठेक्याने केलेल्या शेतात नेला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी भंडागीचे कोतवाल भीमराव शेंडे यांच्याकडे केली. लगेच कोतवाल शेंडे यांनी सदर माहिती नायब तहसीलदार संजय भुजाळे यांना दिली या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार हे घटनास्थळी दाखल होऊन मोक्का चौकशी केली व विविध पुरावे गोळा करून स्वस्त धान्य दुकान सील करूनकारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये शांताराम पासरे यांच्या शेतातील टिनाच्या शेडमध्ये अंदाजे पन्नास किलो वजनाचे 12 गव्हाचे पोते, एवढ्याच वजनाचे 3 तांदळाचे पोते व रासायनिक खताचा साठा ताडपत्रीने झाकुन ठेवण्यात आला होता. तो गावकरी व तलाठ्याच्या समक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला. ही कारवाई कळमेश्‍वरचे नायब तहसीलदार संजय भुजाडे व पुरवठा निरीक्षक वैशाली माळी, तलाठी सुरतकर व कोतवाल भिमराव शेंडे यांनी केली.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply