nagpurruralNews

स्टार बस वर नियंत्रण कुणाचे?

111Views

नागपुर,

शहरी भागातील प्रवासी वाहतुकीत स्टार बस चा खुप मोठा वाटा आहे, मात्र हीच स्टार बस सध्या प्रवाश्याच्या जीवावर उठली असून शेळया मेंढ्यां ची ज्या प्रकारे वाहतूक केली जाते त्या प्रकारे प्रवश्यांची वाहतूक केली जात आहे, मात्र या कड़े वाहतूक विभाग पोलिस आणि स्वता परिवहन वीभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नियंत्रण कुणाचे? हा प्रश्न आहे,

कन्हान आणि इतर ग्रामीण भागातील शाळकरी विधार्थी आणि चाकरमाने नागपुर ला येणे जाने करीता स्टार बस चा आधार घेतात, आज सकाळी 09:00 ला कन्हान वरुन नागपुर वरुन निघनारी स्टार बस क्रमांक MH31 CA 6228 मधे अवैद्य प्रवासी वाहतूकी प्रमाणे खचा खच गर्दी होती बस मधे बसाल तर सोडा साध पाय ठेवाल पण जागा नसावी त्या मुळे या कॉलेज तरुनानी बस ला लटकने पसंत केले मात्र चालक आणि वाहक यांना कदाचित मोठी दुर्घटना घटु शकते याची कल्पना नसावी त्या मुळे त्यानी ही बेदिक्कत बस पुढे हांकने पसंत केले आधीच कन्हान नदी वरील पुल शेवटच्या घटका मोजत आहे तर आधीच हा पुल अरुंद असल्याने या ठिकाणी मोठ्या घटना घड़लेल्या आहे, मात्र या घटने वरुन अस दिसून येते की याच गाम्भीर्य कुणालाच नाही,

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply