News

सेनेच्या व्यूहरचनेत भाजप टार्गेट

19Views

मतदारसंघातील जातीय समीकरण, पक्षाच्या कमतरता लक्षात घेऊन भाजपचा ‘गेम’करणारी स्ट्रॅटेजी आखण्यावर शिवसेनेचा भर राहण्याचे संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत स्ट्रॅटेजीच्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचवेळी भाजपदेखील असेच डावपेच आखण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना त्यांनी केली.

नागपूर लोकसभा मतदारसंघातही जातीय समीकरणाचा आधार घेतला जाण्याची शक्यता आहे. ऐनवेळी युती तुटल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते, महापालिका निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी, सद्यस्थिती, कोणती व्होट बँक कुणासोबत राहील, विविध समाजांचे प्राबल्य, कोणता समाज कुणावर नाराजी व्यक्त करेल, प्रतिस्पर्ध्यांचे संभाव्य उमेदवार, काँग्रेस व इतर पक्षांचा प्रभाव या सर्व बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे. निवडणुकीत पैसा, विकासकामे आणि इतर कोणते मुद्दे किती प्रभावी राहतील, हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न यावेळी झाला.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply