nagpurruralNews

सिल्लेवाडा ग्रा.पं.च्या उपसरपंचावर खुनी हल्ला?

परिसरात अनेक चर्चेला ऊत उपसरपंचाच्या शेतात घडली घटना

79Views

खापरखेडा :- दिलीप गजभिये ( रिपोर्टर )

स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिल्लेवाडा ग्रा.पं.च्या उपसरपंचाच्या मानेवर ब्लेडने वार करून यांच्यावर खुनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उपसरपंचाच्या शेतात उघडकीस आली त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून परिसरात विविध चर्चेला ऊत आला आहे गंभीर जखमी उपसरपंचाचे नाव मधुकर शंकरराव दुगाने वय 48 रा सिल्लेवाडा असे आहे मधुकर दुगाने हे सिल्लेवाडा ग्रा.पं.चे माजी सरपंच व वर्तमान उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत दुगाने यांची राजकीय क्षेत्रात जबरदस्त पकड असून आ सुनील केदार यांचे निकटवर्तीय आहेत मधुकर दुगाने रोजच्या सवयी प्रमाणे सोमवार 6 जून ला सकाळी मॉर्निंग वाकला गेले सकाळी 7.30 च्या सुमारास घरी परत आले चहा घेऊन मोबाईल व चष्मा टेबलवर ठेऊन आपल्या शेताकडे गेले मधुकर दुगाने यांचा छोटा भाऊ उमेश व त्यांचा भाचा रुपेश बोपचे सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास बैलबंडीने शेताकडे जात असताना त्यांना पायवाट मार्गावर गंभीर रक्तबंबाळ अवस्थेत पडले असल्याचे दिसून आले जवळून बघितले असता त्यांच्या मानेवर थर्माकोल कापणाऱ्या ब्लेडने दोन वार दिसून आले यावेळी भाचा रुपेश व भाऊ उमेश यांनी आरडाओरडा करताच जवळच शेळी चारणारे गावातीलच लोक धावत आले गंभीर जखमी मधुकर दुगाने यांना उचलून खापरखेडा येथील खाजगी रुग्णालयात हलविले मात्र दुगाने यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील अलेक्सिस या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले खापरखेडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम, श्वान पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून पोलिसांनी रकताने भरलेली कटर ब्लेड आणि दुगाने यांच्या घरून त्यांचा मोबाइल जप्त केला आहे दुगाने राजकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांचे सर्व सामान्य नागरिकांशी संबंध होते शिवाय ते सरकारी स्वस्थ धान्य दुकानाचे मालक होते सिल्लेवाडा ग्रा.पं.च्या राजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांचा कोणतरी राजकीय शत्रू असावा आणि त्यांनीच सूडभावनेच्या दृष्टीकोनातून खुनी हल्ला केला का? की दुगाने यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का? दिशेने पोलिस तपास करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे दुगाने यांची प्रकुर्ती ठिक असल्याची माहिती मिळाली असून ते शुद्धीवरच आल्यावर खरी माहिती कळेल

मंगळवारला निषेध मोर्चा
खापरखेड़ा परिसरात गुन्हेगारीचा ग्राफ वाढलेला असून मोठया प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे परिसरात खुनासह अनेक घटना घडल्या आहेत उपसरपंच मधुकर दुगाने यांच्यावर खुनी हल्ला झाला असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणने आहे या घटनेचा निष्पक्ष तपास करने व परिसरात सुरू असणारे अवैध धंदे बंद करण्यासाठी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून खापरखेड़ा, दहेगाव रंगारी भानेगाव बंद करण्याचे आव्हान करण्यात आले आहे सदर निषेध मोर्चा अण्णा मोड ते खापरखेड़ा पोलिस स्टेशन येथे जाणार आहे खापरखेड़ा परिसरातील अवैध धंदे बंद करण्या संदर्भात महिला मंडळ यांनी नुकतेच निवेदन दिले असून सोमवारी दुगाने यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचा निषेध करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply