nagpurruralNews

सावनेर नगरित प्रभू रामाच्या जन्मोत्सव निमित्य शोभायात्रे चे आयोजन

211Views

सावनेर तालुका
रिपोर्टर :- विनयकुमार वाघमारे

हिंदू धर्म शास्त्रानुसार रामनवमी म्हटले की हिंदूंची दुसरी दिवाळीच असते ‘रामनवमी चैत्र शुक्ल महिन्यात साजरी केली जाते. हिंदू धर्म शास्त्रानुसार या दिवशी श्रीराम जन्म झाला होता, चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे रामनवमी होय. .राम नवमी हा उत्सव राजा दशरथ पुत्र राम यांच्या जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो .या दिवशी राजा दशरथ यांची पहिली सर्वात मोठी राणी कौशल्याने प्रभू रामाला जन्म दिला होता,जो की विष्णू देवाचा सातवा अवतार मानला जातो. रामनवमी हा भारतामध्ये साजरा करण्यात येणाऱ्या उत्साहामध्ये प्रमुख उत्साह मानला जातो .
सावनेर नगरीत रामनवमीच्या उत्सवासाठी दहा ते पंधरा दिवसा अगोदर पासूनच नगरीतील व्यापारी संघ, श्रीराम भजन मंडळ तसेच लहान मुलांपासून तर मोठ्या वयोवृद्ध माणसांमध्ये रामनवमीची उत्सुकता पहाव्यात दिसून येऊ लागली आहे .शोभायात्रेत एकूण २२ झाक्या सहभागि होते, शोभायात्रे करिता दरवर्षी ठरलेला मार्ग मुरलिधर मंदिरपासुन होळी चौक, बाजार चौक,गडकरी चौक,गांधी चौक होऊन बसस्थानका पर्यंतचा मार्ग निर्धारित करून रोशनाईत सुसज्जित करण्यात आलेला आहे तसेच अनेक सेवाभावी संस्थाकडुन ,मुख्य मार्गावरील व्यापारी वर्गांनी आप आपल्या सोयीनुसार जागो जागी अल्पोहार, शरबत, चहा, भोजन वाटप करण्यात आले तसेच शोभायात्रेत अनेक प्रकारच्या मनमोहक असे भारतीय संस्कृतीला अनुसरून झाकयांची जय्यत तयारी सुरू केलेली असुन सर्वत्र भगवा पताका व श्रीराम जय रामच्या गजर सुरू झालेला दिसुन आले.
रामनवमीची शोभायात्रा सायंकाळी ०५ वाजता मुरलीधर मंदिर येथून सुरू होऊन रात्री इथेच येऊन संपली . रामनवमीच्या शोभायात्रेची जय्यत तयारीसाठी व सुव्यवस्थेसाठी नुकतीच सावनेर पोलिस स्टेशन अंतर्गत बैठक पार पडून उपविभागीय पोलीस निरीक्षक अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक गायगोले यांच्या मार्गदर्शना संपूर्ण सुव्यवस्थाचि जबाबदारी व्यापारी संघ, रामायन प्रसारक मंडळ, युवा वर्ग असलेला प्रयास टीम यांनी सहकार्य करण्याचे केले. लाखोंच्या संकेत अनेक आजूबाजूच्या खेडेगावातील भाविकांनी येऊन शोभा यात्रेचा आनंद व महाप्रसादाचा लाभ घेतला .

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply