nagpurruralNews

सालईमेंढा तलावात तिघे बुडाले

एकाचा मृतदेह काढला बाहेर

50Views

हिंगणा :- रमेश पाटील ( प्रतिनिधी )

हिंगणा फ्रेंडशिप डे साजरा करण्यास भांडे प्लॉट नागपूर येथून गेलेल्या आठ तरुणांपैकी तिघांचा तेलगाव जवळ असलेल्या सालईमेंढा तलावात तीन तरुण बुडाल्याची घटना आज दुपारी चार च्या सुमारास घडली.एका तरुणांचा मृतदेह काढण्यात पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

तरी दोघांचा शोध सुरू आहे. सागर सुरेश जांबुलकर, वय १७,बंटी प्रेमलाल निर्मल वय १४, गुड्डू प्रथमेश सिद्धांत वय १७ सर्व रा भांडे प्लॉट नागपूर अशी बुडालेल्या तरुणांची नावे असून आज फ्रेंडशिप दे साजरा करण्यासाठी भांडे प्लॉट ,नागपूर येथील आठ मित्र तेलगाव नजीकच्या सा्लईमेंढा तलावावर गेले होते. त्यापैकी तिघे जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले .

खोल पाण्यात गेल्याने दोन मित्र बुडू लागले त्यांना वाचविण्याकरिता तिसरा धावला शेवटी तिघेही जण बुडाले. काठावर बसून असलेल्या मित्रांनाही त्यांची मदत करता आली नाही. या घटनेनंतर घाबरून गेलेल्या मित्रांनी पोलिसांना माहिती दिली .हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहचले .अग्निशमन दलाला सुद्धा बोलावण्यात आले सायंकाळी ६ वाजता एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला .इतर दोन तरुणांचा शोध सुरू आहे।

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply