Home Politics सरकार अजून किती बळी घेणार, हे थांबवा, अन्यथा महागात पडेल, मनोज जरांगे...

सरकार अजून किती बळी घेणार, हे थांबवा, अन्यथा महागात पडेल, मनोज जरांगे पाटलांचा सूचक इशारा 

991
0

‘आम्हाला समाजाचे सेवक म्हणून काम करायचं आहे. मात्र, आता प्रस्थापित लोकांमुळेच आमच्यावर ही वेळ आली असून त्यांनी जर मनावर घेतलं तर दोन तासात आरक्षण मिळेल. मात्र ‘सरकारने आमच्यावर पूर्वीपासून अन्याय केला. आणखी बळीची अपेक्षा आहे का? असा सवाल उपस्थित करत ‘त्यांनी थांबवलं पाहिजे, नाहीतर महागात पडेल, असा सूचक इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दिला आहे. 

छत्रपती संभाजीनगरहून (Chatrapati Sambhajinagar) मुंबईला (Mumbai) जात असतांना  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे मध्यरात्री 2 वाजता नाशिक (Nashik) शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. काही दिवसांपूर्वीच जरांगे यांनी छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात (Yeola) सभा घेतली होती, या सभेदरम्यान स्वागतावेळी जेसीबीवरून पुष्पवृष्टी करतांना खाली पडून गंभीर जखमी झालेल्या विलास गाढे यांची त्यांनी रुग्णालयात भेट घेत डॉक्टरांशी देखीलल गाढेंच्या तब्येतीबाबत विचारपूस केली, मराठा समाज बांधव यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलतांना प्रस्थापित मराठा नेत्यांमुळेच आमच्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना देखील व्यक्तिगत विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल आहे. 

मनोज जरांगे यावेळी म्हणाले की, येवल्यातील घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती बरी आहे. आरक्षणाबाबत सरकार किती दिवस आम्हाला वेदना देणार आणि आमचे बळी घेणार? हे मात्र समजायला तयार नाही. आरक्षण जर या अगोदर दिलं असतं, तर आमच्यावर ही वेळ नसती. सरकारने आमच्यावर पूर्वीपासून अन्याय केला. आणखी देखील बळीची अपेक्षा आहे का? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. ‘त्यांनी थांबवलं पाहिजे, नाहीतर महागात पडेल. आम्हाला समाजाचे सेवक म्हणून काम करायचं आहे. प्रस्थापित लोकांमुळेच आमच्यावर ही वेळ आली. त्यांनी जर मनावर घेतलं तर दोन तासात आरक्षण मिळेल. त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलाय, आम्ही दिला नाही, आरक्षण द्यावं लागेल आणि मुख्यमंत्री साहेब नक्की देतील, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. 

 आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही…. 

दरम्यान चाळीस दिवसानंतर आम्ही आरक्षण  (Aarakshan) घेतल्याशिवाय सोडणार नाही. समाजाला आवाहन करतो की जास्त वेळ उन्हात थांबू नका. मात्र ही खदखद अनेक वर्षांपासूनची आहे. आता लाट बाहेर पडत आहे. ज्यांना आम्ही प्रतिष्ठित समजत होतो, ते चिल्लरपणा करायला लागले. पैसे कमवण्यासाठी आंदोलन नाही, न्याय देण्यासाठी आंदोलन आहे. त्यांना वाटलं, आम्ही जमीनच विकत घेतली. आमचे कपडे प्रस्थापित लोकांमुळेच फाटले. भुजबळ साहेब यांना व्यक्तिगत विरोध नाही. आम्हाला टीका करायची, म्हणून आम्ही आंदोलन करत नाही. पण आरक्षणाला विरोध केला तर कुणालाच सोडणार नाही.  ग्राउंड लेव्हलवर मराठा आणि ओबीसी दोन्ही बांधव एकत्र आहोत. काही आमचे आणि काही त्यांचे दोन तीन जण जमून देत नसल्याचे ते म्हणाले. 

Previous articleमीडियाशी कमी बोला, काम करा, ही शेवटची संधी, सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना निर्वाणीचा इशारा
Next articleराष्ट्रवादीतील शरद पवार गटाचा मोठा नेता शिंदे फडणवीस सरकारसोबत येणार असल्याचे संकेत व्यक्त करत राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here