Home News समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : झोपेच्या डुलकीने चालकाचा ताबा सुटला, ट्रकला धडकून...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : झोपेच्या डुलकीने चालकाचा ताबा सुटला, ट्रकला धडकून २ ठार, ३ गंभीर

163
0

बुलढाणा – समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची नोंद झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवरील चेनेज 268 या ठिकाणी आज पहाटे सुमारास एका भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ही कार पुण्याहून वाशिमच्या दिशेने जात होती. पहाटे अंदाजे पाचच्या सुमारास कार चालवणाऱ्या चालकाला डुलकी आल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडक बसली. धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की कारचे समोरील भाग पूर्णपणे चुरगळले गेले.

जखमींना तत्काळ मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न दिसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने त्वरीत धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

Star Apex News आपल्या वाचकांना विनंती करते की, दीर्घ प्रवास करताना योग्य विश्रांती घ्यावी आणि झोप पूर्ण न झाल्यास वाहन चालवणे टाळावे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.


Previous articleBaramati Crime News | १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येने हादरली बारामती: छेडछाड, धमक्या आणि मानसिक त्रासामुळे घेतलं टोकाचं पाऊल
Next article२००८ मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा भारतात; अमेरिकन अधिकाऱ्यांकडून भारतीय यंत्रणांच्या ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here