Entertainment

संजू सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज

अभिनेता संजय दत्तची बायोपिक संजू या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये संजय दत्तची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत.

34Views

मुंबई : राजकुमार हिरानी दिग्दर्शिक संजू या सिनेमाचा मच अवेटेड ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता संजय दत्तच्या या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे.  या ट्रेलरमध्ये संजय दत्तची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत.

संजय दत्तला अवैध शस्त्रास्त्रप्रकरणात 6 वर्षांची शिक्षा झाली होती. येरवडा कारागृहात त्याने शिक्षा भोगली होती. येरवडा कारागृहाच्या दृश्यांनीच ट्रेलरची सुरुवात करण्यात आली आहे.

रणबीर कपूरने हुबेहूब संजय दत्त साकारला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या शुटिंगची दृश्य व्हायरल झाली होती. त्यानंतर टीझरही रिलीज झाला होता. त्यामध्येही रणबीर कपूरमधील संजू बाबा दिसला होता.

मात्र चाहते ट्रेलर रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आज अखेर टिझर रिलीज झाला. त्यानंतर अल्पावधीतच या ट्रेलरला यूट्यूबवर लाखो व्ह्यूव्ज मिळाले.

आता सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. संजू सिनेमा अगोदर मार्च महिन्यात रिलीज होणार होता, मात्र नंतर ही तारीख पुढे ढकलत ती 29 जून करण्यात आली.

या सिनेमात अभिनेत्री मनिषा कोईराला संजय दत्तच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर परेश रावल संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसतील.

याशिवाय अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दिया मिर्झा हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply