nagpurruralNews

शेतकर्यांना बोंडअळी व पिकविम्याचे पैसे मिळण्याबाबत नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेना आक्रमक

53Views

नांदगाव खंडेश्वर:- उत्तम ब्राम्हणवाड ( प्रतिनिधी )

शेतकर्यांना नैसर्गिक व शेतमालाअभावी व नाफेडला विकलेल्या तुर व चना चे पैसे न मिळाल्यामुळे व कर्जमाफी होऊन सुद्धा बॅक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे आर्थीक टंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यातच बि.बियाण्याचे भाव वाढले आहे कोणत्याही कृषी दुकाणदार उधार द्यायला तयार नाही.बॅकेत चकरा माराव्या लागत आहे बॅक कर्ज देण्यास तयार नाही व कर्ज माफ झाल्याची यादी दाखवण्यास तयार नाही .अशा परिस्थितीत शेतकर्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिझावे लागत आहे.पण तिथे ही फारसा प्रतिसाद मिळत नाही.अशा परिस्थितीत आत्महत्याचे आणखी प्रमाण वाढू शकते.

वरील सर्व अडचणीचा विचार करुन मा.तहसिलदार साहेब यांना नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख डाॅ.प्रमोद कठाळे यांच्या नेतुत्वात निवेदन देऊन बोंडअळी व पिकविम्याची मदत ताबोडतोब देण्याची मागणी केली.तसेच कर्जमाफीची यादी बॅकेत लावुन गावोगावी गावानुसार वाचन करण्यात येवुन नविण कर्ज ताबडतोब देण्याची मागणी केली.तसेच चांदी प्रकल्पामधुन खोदलेल्या कॅनलमुळे अर्धवट राहिलेल्या कामामुळे बहुतांश शेतकर्यांची शेती खरडुन गेली आहे.

अशा शेतकर्यांना आर्थीक नुकसान भरपाई देण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन देवुन शासनाने मागण्याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेळण्याचा ईशारा दिला आहे.

निवेदन देतेवेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डाॅ.प्रमोद कठाळे,महिला शिवसेना आघाडी जिल्हा प्रमुख शोभाताई लोखंडे,शहर प्रमुख तथा बांधकाम सभापती अरुण लाहबर ,उपनगराध्यक्ष सौ.प्रितीताई ईखार,माजी उपसभापती रेखाताई नागोलकर ,उपशहरप्रमुख सतीश पोफळे,प्रमोद पाटील ठाकरे,पवन डोफे,रवि ठाकुर,भानुदास उगले.दिलीप तामगाडगे.विजय हंबरडे.रत्नाकर खेडकर .दिपक लोणकर.विष्णुभाऊ तिरमारे.पुंडलिकराव तर्हेकर.हिरामण चावळे.रामदास सानप.नाना वणवे बंडु चोरे.बाळु ढोपे.विजय अमवडे.सोयश सिरसागर.राजु जगताप.नामदेव सानप .रामकृष्ण गवई.सुभाष मिसळ. ईत्यादी शिवसेना कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply