Home Uncategorized वेळापत्रक फेटाळलं, शेलक्या शब्दात सुनावलं, राहुल नार्वेकरांबाबत कोर्ट काय काय म्हणालं?

वेळापत्रक फेटाळलं, शेलक्या शब्दात सुनावलं, राहुल नार्वेकरांबाबत कोर्ट काय काय म्हणालं?

292
0

विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी असून त्या दिवशी तरी वेळापत्रक घेऊन यावे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. 

आज विधानसभा अध्यक्षांच्या (Maharashtra Assembly Speaker Rahul Narweka) दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली आहे. सुधारित वेळापत्रक देण्यासाठी कोर्टाने 30 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आले आहे. आज वेळापत्रक सादर न केल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केले आहे. वेळापत्रकावर आम्ही नाराज आहोत आम्ही समाधानी नाही. विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी असून त्या दिवशी तरी वेळापत्रक घेऊन यावे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे

कोर्ट काय म्हणाले? 11 मे पासून अध्यक्षांनी केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावेच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधिशांनी केली आहे.दैनंदिन काम करताय तर त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल. जर तुम्ही ठोस निर्णय घेत नसाल तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. याचिका निवडणूक आयोगासमोर नाही तर अध्याक्षांसमोर आहे. आतापर्यंत झलेले छोटे मोठे निर्णय सांगू नका, अध्यक्षांचे वेळापत्रक द्या. दसऱ्याच्या सुट्टीमध्ये अध्यक्षांसमोर बसून तुषार मेहता वेळापत्रक ठरवतील, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे काय म्हणाले? कुठलंही वेळापत्रक अजून निश्चित झालेले नाही. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी आहे, तेव्हा आपल्याला वेळापत्रक कळेल. तुषार मेहता म्हणाले की मी अध्यक्षांबरोबर बसतो आणि आम्ही एक वेळापत्रक ठरवतो. तर कोर्ट म्हणाले आम्ही तुम्हाला एक शेवटचा चान्स देतोय. दसऱ्याच्या सुट्टीत तुम्ही बसा आणि तीस तारखेला परत आमच्याकडे 30 ऑक्टोबरला या. जर ते वेळापत्रक आम्हाला मान्य असेल तर ठीक आहे नाहीतर आम्ही आमचे वेळापत्रक देऊ. त्यानुसार आता पुढची सुनावणी 30 ऑक्टोबर आहे.

Previous articleMgnrega : दिलासादायक! मनरेगाच्या निधीत सरकार करणार एवढ्या कोटींची वाढ, बजेटमधील 95 टक्के निधी खर्च
Next articleKalyan News : तुम हमसे फिर से छुप रहे हो,और.. फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात 16 लाखांचा दंड वसूल, 167 टीसींची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here