News

वाजपेयींची प्रकृती चिंताजनक.

19Views

नवी दिल्ली:-

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीयांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ‘एम्स’ रुग्णालयात राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. वाजपेयी यांना सध्या लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले आहे.

किडनी संसर्गामुळे मागील दोन महिन्यांपासून वाजपेयींवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. काल सायंकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत प्रकृतीबाबत माहिती घेतली. 

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply