News

रेशन दुकान बंद करण्याच्या मागणी करिता धानला येथे गावकऱ्यांचे उपोषण,

143Views

मौदा:-

मौदा तालुक्यातील धानला येथिल सरकारी स्वस्त धान्य दुकान बंद करण्याच्या मागणी करीता आज धानला येथील गावकरी उपोषणावर बसले आहे,

तालुक्यातील धानला येथे शासनाचे स्वस्त धान्य दुकान असून हे दुकान नारायण मेश्राम यांचा कडून चालविण्यात येते मागील काही वर्ष्या पासून गावातील बी पी एल, अंतोदय, ए पी एल, आणि शाळेला पुरवठा होणारे रेशन चे धान्य काळा बाजारात आणि नागपूर येथील कळमना मार्केट मध्ये विकल्या जात असल्याची ओरड होती , त्या नुसार जिल्हाधिकारी नागपूर यांनी सदर दुकानाचे परवाने वारंवार रद्द पण केले होते, मात्र राजकीय हस्तक्षेपा मुळे नूतनीकरणा दरम्यान मेश्राम यांनाच सदर दुकान देण्यात येत होते,

त्या मुळे येथील लाभार्थ्यांचे आणि गरीब जनतेचे रेशन हे परस्पर काळ्या बाजारात विकल्या जात असल्याने धानला ग्रामपंचायत मार्फत ग्राम सभेत ठराव घेऊन मेश्राम यांची दुकान बंद करण्याचे ठरले मात्र शासनाने यावर कसलीही कार्यवाही न केल्या मुळे आज गावकरी बंडू सार्वे यांनी उपोषणाला सुरवात करून सदर दुकान नारायण मेश्राम यांचा कडून कायम स्वरूपी काढून घेण्याची मागणी केली आहे

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply