Home Politics मोहटा देवीकडं दुष्काळ दूर करण्याचं साकडं, निलेश लंकेंवर स्तुतीसुमनं; पारनेरमध्ये दणक्यात एन्ट्री...

मोहटा देवीकडं दुष्काळ दूर करण्याचं साकडं, निलेश लंकेंवर स्तुतीसुमनं; पारनेरमध्ये दणक्यात एन्ट्री करत अजित दादांचं धडाकेबाज भाषण

510
0

Maharashtra Politics: आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर.आर आबांची ओळख होती, आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.

Ajit Pawar Parner Rally : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आज पारनेर (Parner) दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी धडाकेबाज भाषण केलं. संपूर्ण भाषणात अजित पवारांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. तसेच, आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर.आर आबांची ओळख होती, आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. कोरोना काळातील लंकेंच्या कामाचा उल्लेखही अजित पवारांकडून करण्यात आला आहे. त्यासोबतच लंकेंच्या मतदारसंघात  विविध विकासकामं करण्याचं आश्वासन अजित पवारांकडून देण्यात आलं आहे. 

पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट : अजित पवार

अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर असून पारनेरमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, “पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांवर संकट उद्भवलं आहे. यंदा उजनी धरण फक्त 60 टक्के भरलं आहे, नेहमी 100 टक्के भरलेलं असतं. काही भागांमध्ये धरणं भरली आहेत, तर काही भागांमध्ये परिस्थिती बिकट आहे.”

पारनेरसाठी अजित दादांचं मोहटा देवीच्या चरणी साकडं

“नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आमदार निलेश लंके महिलांना देवदर्शन घडवतात. आई मोहटा देवीला राज्यावरील दुष्काळाचं संकट दूर करण्यासाठी साकडे घालतो. माझं आजोळ असल्यानं नगर जिल्ह्याची मला माहिती आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून अहमदनगरच्या काही तालुक्याची ओळख आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देवीकडे प्रार्थना करतो.”

Previous articleDevendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Next articleIsrael-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा दहावा दिवस, संघर्ष सुरुच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here