nagpurruralNews

मोर्शी येथे एलसिबीच्या धाडीत पाच लाखाचा गुटख्यासह टाटा झेन जप्त दोघांना अटक ;एक फरार

96Views

निलेश लोणकर
वरुड ( प्रतिनीधी ) मोर्शी शहरात मोठया प्रमाणात अवैध्यरित्या गुटखा साठवनुक करुन विकल्या जात असल्याची भनक एलसिबीच्या पथकाला लागली होती दरम्यान पेट्रोलिंग करतेवेळी गुप्तमाहीतीच्या आधारे धाड टाकली असता आरोपी फिरोज खान छोटे खान वय ३४ वर्ष रा. ताज कॉलनी मोर्शी,मोहम्मद शकील मोहम्मद रफिक वय ३५ वर्ष रा. माळीपूरा रामजीबाबा मंदिर समोर मोर्शी यांना अटक केली तर अब्दुल साजिद अब्दुल हबीब वय ३५वर्ष रा.फरीद कॉलनी मोर्शी हा फरार झाला.दि. १४ / ०३ /१८ रोज बुधवाराला पोलिस स्टेशन मोर्शी हद्दीत, प्रो.जुगार, रेड करणे करीता पेट्रोलिंग करीत असता,गुप्तमाहीतीदाराकडूमिळालेल्या खबरी वरून फिरोज खान छोटे खान वय ३४ वर्ष रा. ताज कॉलनी मोर्शी,मोहम्मद शकील मोहम्मद रफिक वय ३५ वर्ष रा. माळीपूरा रामजीबाबा मंदिर समोर मोर्शीहे राहत्या घरी अवैध गुटखा साठवून ठेवून विक्री करीत असल्याच्या माहीवरून धाड टाकली असता आहे. वरील आरोपी क्र.१ च्या ताब्यातून एक लाख रु.चा गुटखा व नगदी ३७० रूपये व
आरोपी क्र. दोन च्या ताब्यातून १,५०, ००० हजार रुपयाचा गुटखा व एक टाटा झेनॉन गाडी क्र. एम एच २२ ए ए १६०५ किमंत २, ५०,००० रुपये असा एकुन ५,००,३७० रुपयचा मुद्देमालजप्त करून ०२ आरोपीना अटक करून पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. मोर्शी यांचे ताब्यात देण्यात आले. तर एक आरोपी फरार झाला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक एम.एम.मकामदार पो.नि.सदानंद मानकर,स.पो.नि.किरण वानखडे स्था.गु.शा.यांचे मार्गदर्शनाखाली परी.भापोसे पोलीस अधीक्षक समीर शेख, पो.हे.का.त्र्यम्बक मनोहरे, ना.पो.का. सुनील मलातपुरे,सुधीर पांडे, पोका.दिनेश कनोजिया, अश्विन यादव, चालक गणेश मांडोकार,अजय थोटे यांनी केली.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply