nagpurruralNews

मूस्लिम समाजाचे आरक्षणासाठी धरणे आंदोलन.

शेकडो मूस्लीम बांधवाचे तहसिलदारांना निवेदन.

58Views

अंजनगांव सूर्जी :- प्रविणकूमार बोके ( प्रतिनीधी )

मराठा आरक्षणाची धग अजूनही कायम असतांना आम्हालाही आमच्या हक्काचे आरक्षण द्या या मागणीसाठी आज दि . १०ला शेकडो मूस्लीम बांधवानी तहसील कार्यालयासमोर जमाते ऊलमा संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन केले.

स्वातंत्र्यापूर्वी राज्यकर्ती जमात असलेला मूस्लीम समाजाची स्वातंत्र्यानंतर सामाजीक ,आर्थीक, शैक्षणिक या क्षेत्रात अंत्यत दैयनिय अवस्था झाली असून मूस्लीम समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी न्या.सच्चर कमेटी, न्या.रंगनाथ मिश्रा कमिशन., तसेच महाराष्ट्र शासनातर्फे नियूक्त केलेलेमेहमूदूरहेमान अभ्यास गटाने मूस्लीम समाजाची शैक्षणिक ,आर्थीक स्थिती देशासमोर आणून त्यांना मूख्यप्रवाहात आणन्यासाठी आरक्षणाची गरज असल्याचे आपल्या आहवालात नमूद केलेआहे.त्यांच्या शिफिरशीची दखल घेऊन तत्कालीन शासनाने मूस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देणे मान्य केले आणी न्यायालयानेसूध्दा शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण कायम ठेवले परंतू शासनाने अध्यादेश न काढल्याने त्याची कालमार्यादा संपल्याने व ठोस पाऊल नऊचलल्याने मूस्लीमांचे आरक्षण रद्दबादल ठरले असून.शासनाची ऊदासीनता याला कारणीभूत असल्याने शासनाने आरक्षणासंदर्भात त्त्वरीत पावले उचलावी मूस्लीम समाजाला न्याय द्यावा असे निवेदन मा.मूख्यमत्री यांना तहसिलदार अंजनगांव यांचेमार्फत पाठवण्यात आले.

याप्रसंगी अॕड.आबीद हूसेन, मूफ्ती मो.जाकीरोद्दीन कासमी,विनीत डोंगरदिवे, प्रेमकूमार बोके,मूजफ्फर सर, मौलवी ईकबाल,डाँ. राजीक, मोईन मोहम्मद,जहीर बेग, यांची आरक्षणासंदर्भात अभ्यासपूर्ण भाषणे झाली.धरणे आंदोलनाकरीता शहरातील शेकडो मूस्लीम बांधव तसेच जमात ऊलमा संघटनेचे शेकडो कार्यकर्तै तहसील कार्यालयासमोर जमले होते.आणि पोलीसांचाही प्रंचड बंदोबस्त होता

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply