News

मुंबईतील दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार; १ ठार

13Views
मुंबई:-
मुंबईतील सर्वात मोठं फूल मार्केट असलेल्या दादर फूल मार्केटमध्ये गोळाबार झाल्यानं खळबळ उडाली आहे. या गोळीबारात मनोज मौर्य या इसमाचा मृत्यू झाला आहे.

सकाळी सव्वासहाच्या सुमारास मार्केटमध्ये लगबग सुरू असतानाच ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी मौर्य याच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. त्यात मौर्य जागीच ठार झाला. आरडाओरडा झाल्यानंतर मारेकरी तिथून पसार झाले. गोळीबारात मारला गेलेला मौर्य हा फूल मार्केटमध्ये वजन काटे पुरविण्याचं काम करायचा, अशी माहिती आहे. त्याच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला आणि का झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, या घटनेनंतर मार्केटमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply