News

मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात याचिका.

42Views
मुंबई :-

मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून हिंसक आंदोलनाला चाप लावावा आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केल्याप्रकरणी भरपाई वसूल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादाराने केली आहे.

द्वारकानाथ पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या हिंसक आंदोलनांना प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे.

पाटील यांच्यावतीने अॅड. आशीष गिरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाकडून होत असलेली आरक्षणाची मागणी योग्य असली तरी त्यासाठी सुरू असलेलं हिंसक आंदोलन योग्य नाही. आजच्या महाराष्ट्र बंददरम्यानही राज्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. ही बाब गंभीर असल्याचे गिरी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आज मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. पुणे आणि औरंगाबाद येथे बंदला हिंसक वळण लागले. जाळपोळ, हिंसक निदर्शनांमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply