nagpurruralNews

मदर डेअरीचे दुधसंकलन बंद झाल्याने दुग्धउत्पादकांमध्ये असंतोष.       

13Views

काटोल  :- अनिल सोनक ( प्रतिनिधी )

तालुक्यातील परसोडी येथील मदर डेअरीचे दुध संकलन केंद्र बंद झाल्याने या परिसरातील लाडगाव, परसोडी व केदारपुर तसेच आजुबाजुच्या गावातील एक हजार लिटर दुधाचे काय करायचे हा ज्वलंत प्रश्न दुधउत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिल्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेला शेतकरी पेचात सापडलेला दिसुन येत आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून या परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीसोबतच पुरक व्यवसाय म्हणून दुध उत्पादन करण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाचे अंतर्गत मदर डेअरीचे दुध संकलन सुरू करण्यात येवुन दुधाच्या स्निग्धतेनुसार आलेल्या दुधाला भाव देण्यात आला. शेतमालाला भाव नाही निसर्गाच्या चक्रव्यूहात सापडुन कपाशी व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी शेतजमीनी गहाण टाकून कर्ज काढून गायी व म्हशी विकत घेतल्या आणि दुधउत्पादन सुरू केले मागिल एक वर्षापासून मदर डेअरीचे दुध संकलन केंद्र परसोडी येथे देण्यात आल्याने त्या परिसरातील दुधउत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले असताना नुकतेच ९ आक्टोबर २०१८ पासून अचानक परसोडी केंद्रावरील दुध संकलन बंद करण्यात आले त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत लाडगाव, परसोडी, केदारपुर परिसरातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी  वृषभ मानकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांना निवेदन देवुन बंद करण्यात आलेले दुध संकलन केंद्र सरकारने तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे व दुध संकलन पुर्ववत सुरू झाले नाही तर तिव्र आंदोलन सुरू करण्यात येवुन सुरू असलेली दुध संकलन केंद्रे बंद पाडण्यात येतील असा इशारा वृषभ मानकर यांनी दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनिल वडस्कर, समिर उमप, तिलक क्षीरसागर, विपुल देवपुजारी, मिलिंद देशमुख, केतन देशमुख, विनोद शिरस्कर, विजय महाजन, वृषभ वानखेडे, आशिष राऊत, तसेच मोठ्या संख्येने दुधउत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply