Home Uncategorized बांगलादेशला मोठा धक्का! कर्णधार शाकिब-अल-हसन विश्वचषक २०२३ मधून पडला बाहेर

बांगलादेशला मोठा धक्का! कर्णधार शाकिब-अल-हसन विश्वचषक २०२३ मधून पडला बाहेर

924
0

बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसन विश्वचषकातून बाहेर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली, त्यामुळे तो बांगलादेशचा शेवटचा साखळी सामना असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी लढतीला मुकणार आहे. शाकिब-अल-हसनने मॅथ्यूजविरुद्ध वेळकाढूपणा करत असल्याचे अपील केल्यानंतर पंचांनी त्याला बाद घोषित केले. मॅथ्यूजनेही शाकिबला अपील मागे घेण्याची मागणी केली, पण शाकिबने ते मान्य केले नाही. या घटनेमुळे सध्या तो खूप चर्चेत आहे.

श्रीलंकाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर एक्स-रेमध्ये त्याच्या बोटाला दुखापत झाल्याची पुष्टी केली, ज्यामुळे तो ११ नोव्हेंबर रोजी पुण्यात बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातून बाहेर पडला आहे. राष्ट्रीय संघाचे फिजिओ बेजेदुल इस्लाम खान यांनी दुखापतीबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, “शाकिबला बांगलादेश डावाच्या सुरुवातीला डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती, परंतु त्याने सपोर्टिव्ह टेप आणि वेदनाशामक औषध घेत फलंदाजी सुरू ठेवली.”

फिजिओ पुढे म्हणाले. “सामन्यानंतर त्याचा दिल्लीत तात्काळ एक्स-रे करण्यात आला ज्यात त्याच्या डाव्या बोटाच्या मध्यभागी फ्रॅक्चर झाल्याची पुष्टी केली आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार आठवडे लागतील अशी माहिती देंण्यात आली आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी तो आज बांगलादेशला रवाना होईल.”

बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला
बांगलादेशने श्रीलंकेचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या पराभवासह श्रीलंकेचा संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९.३ षटकांत सर्व १० गडी गमावून २७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने ४१.१ षटकात सात विकेट्स गमावून २८२ धावा केल्या आणि सामना तीन गडी राखून जिंकला.
आता बांगलादेश आणि इंग्लंडनंतर श्रीलंकाही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहे. त्याचबरोबर भारत आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीतील उर्वरित दोन जागांसाठी पाच संघ दावा करत आहेत. मात्र, यापैकी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दावा मजबूत आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स हे संघ नशिबावर अवलंबून आहेत.

Previous article“मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध”, विजय वडेट्टीवार यांची भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here