nagpurruralNews

पेंच व्याघ्र प्रकल्प-वाघ शिकार प्रकरणातील फरार आरोपी देविदास कुमरे यांस अटक

आतापर्यंत तिन आरोपींना अटक

112Views

रामटेक :- ललित कनोजे ( प्रतिनिधी )

रामटेक संपुर्ण राज्यभर गाजलेल्या वाघांच्या अवयव तस्करी व शिकार प्रकरणातील फरार आरोपींना वन्यजिव विभागाकडून पकडण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत.या प्रकरणात अतिशय महत्वाचा समजला जाणारा रामटेक तालुक्यातील ऊसरीपार येथील रहिवासी देविदास कुमरे याला पेंच व्याघ्र प्रकल्प,पवनी बफर क्षेत्राचे वनक्षेत्रपाल पांडुरंग पाखले व त्यांच्या अधिनस्त वनकर्मचारी मारोती मुंडे व तुषार धोटे यांनी दिनांक 2 आॅगष्ट 2018 रोजी अटक केली.या आरोपीस रामटेकच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयांत हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला 10 आॅगष्ट 18 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या आरोपीची रवानगी नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

ऊपरोक्त प्रकरणात एकूण 17 आरोपींना गजाआड करण्यात आले होते.यापैकी धवलापूर येथील महादेव ऊईके याने वनकौठडीतून पलायन केले होते.आठवडाभरानंतर त्याचा मृतदेह धवलापूरच्या जंगलात आढळला होता.
या दरम्यान यापैकी 12 आरोपींना रामटेकच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.मात्र वन्यजिव विभागाने या जामीनाला आव्हान दिले होते.मागील सप्टेंबर 2017 मधे नागपुर ऊच्च न्यायालयाने या सर्व आरोपींचा जामीन रद्द केला होता व तेव्हांपासुन या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न तपास अधिकारी पाखले हे करीत आहेत.यापुर्वी त्यांनी भीमराव परतेती व विजय गेडाम कोलीतमारा या दोन आरोपींना अनुक्रमे 13 मार्च व 1एप्रिल 2018 ला अटक करण्यात आली होती.अजूनही आठ आरोपी याप्रकरणात फरार आहेत व त्यांचा शोध सर्वत्र घेतला जात आहे

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply