News

पावसाने दिली ओढ, नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत.

73Views

 पुणे:-

प्रतिकूल वातावरणामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून ओढ दिलेला पाऊस सक्रीय होण्याची अद्याप काही चिन्हे नाहीत. परिणामी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, जळगाव, अहमदनगर भागात पावसाने नागरिकांची निराशा केली आहे.

मान्सून या वर्षी वेळेवर दाखल झाला आणि जूनमध्ये मध्य महाराष्ट्रात मान्सूनने समाधानकारक चित्रही निर्माण केले होते. मात्र, जुलैमध्ये पावसाने मोठी विश्रांती घेतली. जुलैच्या शेवटच्या पंधरा दिवसात पाऊस पडलाच नाही. ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होईल, असे संकेत हवामान विभागाने दिले होते. सगळे अंदाज फोल ठरवत पावसाने दडी मारली. या प्रतिकूल वातावरणामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा उल्लेखनीय पावसाची नोंद झालेली नाही.

ऑगस्टमध्ये पावसाने जोर धरण्याची अपेक्षा असताना गेल्या आठवडभरापासून नागरिक पावसाच्या हलक्या सरींवर समाधान मानत आहेत. घाट माथ्यावरील पावसाचा जोरही ओसरला आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी आणि काही जिल्ह्यांमध्ये सरासरी गाठण्याऐवढाच पाऊस पडला आहे. मान्सूनला पोषक परिस्थिती निर्माण होण्यास अद्याप आठवडाभर वाट बघावी लागणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवसांत कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या एक दोन सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

 

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply