News

नागपुरात दुधाचे आंदोलन पेटले,

392Views

नागपूर:- राहुल डोकरीमारे,

शेतकऱ्यांनी काढली स्वतःची प्रेत यात्रा, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केल मुंडन,
रस्त्यावर दूध ओतून आणि मंदिरात दुधाच अभिषेक करून केला सरकारचा निषेध,

तर नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खासदार राजू शेट्टी यांचा दूध बंद आंदोलनाच्या समर्थनात आज मौदा च्या तारसा येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला 27 रुपये भाव मिळावा किंवा प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळावा या मागणी साठी रस्त्यावर उतरत स्वतःची प्रेत यात्रा काढून , मुंडन करून रस्त्यावर दूध फेकून सरकार धोरणाचा निषेध केला आहे,

नागपूर च्या तारसा येथे आज झालेल्या दूध आंदोलनात शेतकरी नेते संजय सत्येकार यांचा नेतृत्वात शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करत चक्क स्वतःची अंत्ययात्रा काढत मुंडन करून घेतले, तर गावातील शिव मंदिरात दुधाचा अभिषेक करून येथील मौदा टी पॉईंट समोर दूध रस्त्यावर ओतून दिले,
या आंदोलनात सरकार विरोधात घोषणा देत शेतकऱ्यांनी दुधाच्या 3.5 च्या फॅट ला 27 रुपये प्रति लिटर भाव किंवा 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची मागणी केली आहे, एकीकडे सरकार शेतकऱ्यांना मोठे मोठे आश्वासन देत आहे मात्र त्याची पूर्तता करीत नाहीये, त्या मुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, उत्पादन खर्चात झालेली वाढ बघता दुधाला मात्र 20 रुपये पर्यंत भाव दिल्या जात आहे, त्या मुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांत सरकार विरोधी तीव्र नाराजी असून आज त्याच्याच निषेध म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून दिल आहे,सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठली असून खर्च ही निघणे अशक्य झाले आहे, मुलांचे शिक्षनाचे स्वप्न भंगत आहे, सरकार च्या चुकीचा धोरणाच्या फटक्या मुळे शेतकरी आत्महत्येच्या दारात येऊन ठेपला आहे त्या मुळे स्वतःची अंतयात्रेची वेळ शेतकऱ्यावर आली आहे सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे विरोधात असून आता सरकारची अंत्ययात्रा काढान्याची वेळ आली असल्याचे सांगत संजय सत्येकार यांनी खासदार राजू शेट्टी यांचा आंदोलनाला पाठिंबा दर्शवित हे आंदोलन करीत असल्याचे सांगितले,

 

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply