News

देशभरातील नेत्यांची एम्सकडे धाव वाजपेयींच्या चौकशीसाठी.

62Views

नवी दिल्ली :- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त देशभर पोचताच त्यांच्या चाहत्यांनी नवी दिल्लीकडे धाव घेतली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी देशभर जपतप सुरू आहेत. एम्सबरोबरच राजधानी दिल्लीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही आज पुन्हा येथे दाखल झाले आहेत.

 दरम्यान, अटलजी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला यांच्यासह विविध पक्षाचे नेते दिल्लीत एम्समध्ये दाखल झाले आहेत.

अटलजी यांची प्रकृती खालावल्याने भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील मुख्य कार्यालयात गर्दी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दिल्लीकडे रवाना होणार आहेत.पंतप्रधान मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, त्यांची कन्या प्रतिभा यांच्यासह मंत्री पियुष गोयल , स्मृती इराणी, सुरेश प्रभू, सुषमा स्वराज आदींनी काल एम्सला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. वाजपेयींच्या चाहते मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल झाले आहेत.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply