nagpurruralNews

गोंडखैरी शिवारात दोन दिवसात पुन्हा आढळला दुसरा कुजलेला मृतदेह…!

गोंडखैरी शिवारातील दुसरी घटना...!

73Views

गोंडखैरी :- दिलीप ठाकरे ( प्रतिनिधी )

24/जूलै पासून बेपत्ता..!

कळमेश्वर  तालुक्यातील गोंडखैरी शिवारात दोन दिवसाआधी चिचभवन निमजी खदान बाजार परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला तर दोन दिवसात पुन्हा वार्ड क्रंमाक चार शेती परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला.

सविस्तर वृत्त असे मृतक सुधाकर बळीराम चोपडे वय 60 वर्षे राहणार वार्ड क्रंमाक 4, येथील रहवासी असून (24/जूलै) ला देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने स्थानिक श्री विठ्ठल-रुख्मिनी देवस्थान मंदिरात पुजा-पाठ करुन येतो असे घरच्यांना सांगून सुधाकर चोपडे हा रात्री उशीरा पर्यंत घरी पोहचलाच नाही. त्यामुळे घरच्यांनी शोध मोहिमेअंतर्गत आजूबाजूच्या परिवारांना व नातलगांना दुरध्वनीवरुन संपर्क केला असता कुठेच शोध लागलेला नाही. त्यामुळे कुंटूबियांना भितीचे सावट दिसू लागले.
दुसऱ्या दिवशी (25/जूलै) ला पुन्हा रात्री पर्यंत अख्या रिस्तेदारांच्या घरी जाऊन विचारपुस करुन सुध्दा रात्री उशीरा पर्यंत सुधाकर चा पत्ता लागलेला नाही. तिसऱ्या दिवशी (26/जूलै) ला त्यांच्या मोठा मुलगा शैलेश सुधाकर चोपडे यानी कळमेश्वर पोलीस-स्टेशन गाठले. व लेखी तक्रार देऊन सविस्तर माहिती सांगण्यात  आली. त्यानंतर कळमेश्वरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर बहादूरे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधमोहिमेस सुरवात करण्यात आली. व वायरलेस द्वारे बेपत्ता इसमाचे नाव व वर्णन सांगून शोधमोहिमेस सुरवात झाली.
मात्र (2/आँगष्ट) ला दुपारी 2.00 वाजताच्या दरम्यान वार्ड क्रंमाक चारच्या गोंडखैरी शिवारात अज्ञात इसमाचे कुजलेले अवस्थेत मृतदेह दिसून आले असता परिसरात वा-या सारखी बातमी पसरताच शेकडोंच्या संखेने बघ्यांची गर्दी झाली. व त्यातच मृतकाची ओळख पटली. त्यांच्या नतेवाईकांना ताबडोब माहीती देऊन मृतक सुधाकर चोपडे हाच आहे अशी खात्री पटली. व कळमेश्वर पोलीस-स्टेशनला दुरध्वनीवरुन माहीती दिली.  घटनेची माहीती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. पंचनामा लिहण्यास सुरवात झाली. मृतकाला उत्तरीय तपासणी करीता कळमेश्वरचे ग्रामीण रुग्णालय येथे रवना करण्यात आले. आकस्मिक मृत्यूची नोंद करुन (3/जूलै) ला  स्थानिक गोंडखैरी मोक्षधाम येथे अत्यसंस्कार करण्यात आला.
त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुले,एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
पुढील तपास पोलीस निरिक्षक बहादुरे यांच्या नेतृत्वात पोलीस पुष्पपाल आकरेसह पोलीस हेडकाँस्टेबल प्रकाश ऊईके,सांदेकर,भुषण घोडके अधिक तपास करीत आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply