nagpurruralNews

गोंडखैरी येथे कुसत्यांचा आमदंगल व राष्ट्रीय दुय्यमचा खडा तमाशा

21Views

गोंडखैरी :-

दिलीप ठाकरे / प्रतिनिधी

कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी येथे जय बजरंग व्यायाम शाळा व ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी प्रमाणे घटस्थापना दिनाचे औचित्य साधून कुसत्यांचा आमदंगल बाजार चौक जय बजरंग व्यायाम शाळा परिसरात आयोजित केलेला आहे.
सालाबादाप्रमाणे सर्वापित्री दर्श अमावस्या (अखरपक) च्या पाडव्याचे औचित्य साधून तसेच घटस्थापनेच्या दिवशी कुसत्यांचा आमदंगल बाजार चौक परिसरात कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनिल केदार, संजय देशपांडे सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख पाहुण्यांच्या तालुका क्रिडा अधिकारी इटनकर उपस्थितीत बुधवार (१०/आॕक्टोंबर) ला दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत घेण्यात आले. कुसत्यांचा आमदंगल एकुन ५६ पहेलवानानी हौजामध्ये उत्तमरित्या कुस्ती खेळण्यात आली. जवाहरनगर भंडारा येथील पहेलवान यांनी सतत लागोपाट तिन कुस्त्या पटकावल्या त्यांना आमदार केदार यांनी त्याला सन्माननीत करुन प्रथम विजयी पुरस्कारीत करण्यात आले. अटी शर्यती नुसार असून पंच कमेटीचा अंतीम निर्णय होता. शाल श्रीफल देऊन पहले दुसरे पारितोषिक देऊन सन्माननीत करण्यात आले. कोणीही दारु पिऊन गोंधळ घालु नये अन्यथा गोंधळ घालणाऱ्यास पोलीस कारवाईस समोर जावे लागेल. असे आवाहन जय बजरंग पंच कमेटीच्या रेफरी पहेलवान मारोती अत्करी, रमेश कुबडे, विद्यानंद कुबडे, भास्कर तिडके, शामराव खडसे, वामन बरगट, यांनी पंचाचे योग्य निर्णय देऊन उत्तम सहकार्य यांच्या वतीने करण्यात आले.
प्रमुख उपस्थितीत कळमेश्वर सावनेर क्षेत्रातील आमदार सुनिल केदार, सामाजिक कार्यकर्ता संजय देशपांडे, उपसभापती नरेद्र पालटकर, माजी सभापती वैभव घोंगे, पं.स.सदस्य अजय वाटकर, प्रदिप चनकापूरे, सरपंच चांगदेव कुबडे, उपसरपंच मोहन झोडापे, माजी उपसरपंच हेमराज पोहनकर अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
गुरुवार (११/आॕक्टोंबर) ला सकाळी १० ते सायंकाळी १० वाजेपर्यंत राष्ट्रीय दुय्यमचा खडा तमाशा आयोजित केलेला आहे. निशाण कलंगी पार्टीचे शाहीर मानिक देशमुखसह सुर मा. चिंतामणी यांच्या पार्टीसह तर निशाण तुर्रा निशाण पार्टीचे शाहीर अंबादास नागदेवेसह विनोद बागडे यांच्या पार्टीसह राष्ट्रीय दुय्यमचा खडा तमाशाचे आयोजन स्थानिक शौकीन आयोजकांनी आयोजित केलेला आहे. तरी सर्व शौकीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी ग्रा.पं. सरपंच चांगदेव कुबडे उपसरपंच मोहन झोडापे माजी उपसरपंच हेमराज पोहनकर सह अन्य संचालन दुर्गादास तभाने यांनी केले तर आभार उपसरपंच मोहन झोडापे यांनी केले. जयबजरंग व्यायाम शाळा व स्थानिक शौकीन कार्यकर्त्यांनी केले आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply