Home Uncategorized खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊ नका’; विनोद पाटील यांचे...

खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊ नका’; विनोद पाटील यांचे मराठा आंदोलकांना कळकळीचे आवाहन

870
0

मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे, असा इशारा विनोद पाटलांनी दिला आहे

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने मुंबईत गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केला आहे. कावळे यांच्या आत्महत्येनंतर विनोद पाटील यांनी मराठा आंदोलकांना कळकळीचे आवाहन केले आहे. खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.

आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा आत्महत्या हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.

सरकारने तात्काळ पाऊले उचलावी

तसेच विनोद पाटलांनी सरकारला देखील इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे.

Previous articleक्रिकेटचे फॅन आहात? मग या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे…काय आहे योग्य उत्तर? कमेंटमध्ये आम्हाला सांगा
Next articleगुगलचे कर्मचारी चिंतेत! पुन्हा कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, नेमकं कारण काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here