Home Uncategorized कोणासोबत बंद खोलीत अडकायला आवडेल? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवार,...

कोणासोबत बंद खोलीत अडकायला आवडेल? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवार, आशिष शेलार म्हणाले ‘राज ठाकरे’

216
0

एका कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओकने मंत्र आशिष शेलारांना (Ashish Shelar) मोठा गमतीशीर प्रश्न विचारल्याचं पाहायला मिळाल. या प्रश्नाला शेलार यांनी उत्तर देखील तसच दिलं आहे

Ashish Shelar : एका कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओकने मंत्री आशिष शेलारांना (Ashish Shelar) मोठा गमतीशीर प्रश्न विचारल्याचं पाहायला मिळाल. या प्रश्नाला शेलार यांनी उत्तर देखील तसच दिलं आहे. तुम्हाला बंद दाराआड उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) की शरद पवार (Sharad Pawar) यापैकी कोणाशी अडकायला आवडेल? असा प्रश्न प्रसाद ओकने आशिष शेलार यांना विचारला. यावेळी आशिष शेलार म्हणाले राज ठाकरेंसोबत अडकायला आवडेल. त्यांच्याबरोबर आमची नैसर्गिक मैत्री तर आहेच पण ते एक कलाकार आहेत असे शेलार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?आशिष शेलार यांना प्रसाद ओक यांनी चित्रपटाच्या कथा संकल्पनेला धरुन एक मजेशीर प्रश्न विचारला. तुम्ही कधी चुकून कोणाबरोबर बंद खोलीत अडकलात तर ती व्यक्ती कोण असेल. तुम्हाला उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवार हे तीन पर्याय आहेत. त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, या तीन पर्यायांपैकी कोणताच पर्याय नसेल तर मला राज ठाकरे यांच्याबरोबर बंद दाराआड अडकायला आवडेल. त्यांच्याबरोबर आमची नैसर्गिक मैत्री तर आहेच पण ते एक कलाकार आहेत. कलेवर प्रेम करणारा माणूस आहे. त्यांच्याबरोबर वाद, संवाद, चर्चा, विमर्श करायला आवडते आणि आनंद मिळतो अशी ती व्यक्ती आहे. बंद दाराआड त्यांच्याबरोबर नकलांपासून अकलेपर्यंत सर्व प्रकारची मेजवानी प्राप्त होईल असे उत्तर शेलार यांनी दिले.

Previous article‘एका रात्रीचे किती घेतेस,…’, अभिनेत्री सुरेखा कुडची यांना विचारणा; खळबळजनक खुलासे
Next articleएप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here