News

‘आलोकनाथने माझ्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला’.

14Views

मुंबई: –

विन्टा नंदा,नवनीत झिशन,संध्या मृदुल आणि ‘हम साथ साथ है’ चित्रपटातील एका क्रु मेंबर नंतर आता अभिनेत्री दीपिका अमीननेही आलोकनाथवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. एका टेलीफिल्मच्या चित्रीकरणादरम्यान आलोकनाथने जबरदस्तीने दीपिकाच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला होता असं दीपिकाने ट्विट करून सांगितलं आहे.

आलोकनाथवर सिनेसृष्टीतील ४ महिला कलाकारांनी आरोप केल्यानंतर बुधवारी दुपारी दीपिका अमीननेही #मीटू म्हणत आलोकनाथने दिलेल्या त्रासाला वाचा फोडली. अनेक वर्षांपूर्वी दीपिका आणि आलोकनाथएका टेलिफिल्मसाठी चित्रीकरण करत होते. या टेलिफीमच्या चित्रीकरणादरम्यान एक दिवशी दीपिका एकटीच तिच्या खोलीत बसली होती. तेव्हा दारूच्या नशेत तिच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न आलोकनाथने केला होता. त्यानंतरही आलोकनाथने दीपिकाला त्रास देऊ नये म्हणून सेटवरची सगळी माणसं कायम तिच्या अवतीभवती असायचे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply