News

आज कोंढा जिल्हा परिषद क्षेत्राची फेरमतमोजणी.

25Views

भंडारा :-

जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सन २०१५मध्ये पार पडली. या निवडणुकीत पवनी तालुक्यांतर्गतच्या कोंढा जिल्हा परिषद क्षेत्राच्या मतमोजणीला पराभूत उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिल्याने न्यायालयाने आता फेरमतमोजणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी शुक्रवारी, १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पवनी तहसील कार्यालयात फेरमतमोजणी घेण्याचे ठरविले आहे. पंचायत समिती पवनी व जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ६ जुलै २०१५ रोजी झाली. या निवडणुकीत कोंढा येथील गट क्रमांक ४२ जिल्हा परिषद क्षेत्रातून विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद श्रावण कुर्झेकर हे ४२ मतांनी विजयी झाल्याचे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले होते. या निवडणुकीत कुर्झेकर यांना २ हजार ७१४, तर गंगाधर मुकुंदा जिभकाटे यांना २ हजार ६७२ मते मिळाली होती. यावर आक्षेप घेत पराभूत उमेदवार जिभकाटे यांनी लेखी अर्ज करून फेरमतमोजणी करण्याची मागणी केली होती. आता तब्बल तीन वर्षांनंतर ही मतमोजणी घेण्यात येत असल्याने त्याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply